Sanjay Bansode : पालकमंत्री बनसोडे यांची आमदार गुट्टे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट | पुढारी

Sanjay Bansode : पालकमंत्री बनसोडे यांची आमदार गुट्टे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या मौजे. बनपिपळा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यानिमित्त आ.डॉ.गुट्टे यांच्या वतीने पालकमंत्री ना.बनसोडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. Sanjay Bansode

याप्रसंगी ना. बनसोडे व आ.डॉ.गुट्टे या दोघांमध्ये राजकीय स्थिती, बदलती समीकरणे यासह गंगाखेड मतदारसंघातील व परभणी जिल्ह्यातील समस्या, अडचणी व प्रलंबित प्रश्न विषयी सविस्तर चर्चा झाली. तसेच यापुढे परभणी जिल्ह्यास निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन ना. बनसोडे यांनी यावेळी दिले. Sanjay Bansode

पूर्वीपासून ना.बनसोडे व आ.डॉ.गुट्टे यांची मैत्री सर्वश्रूत आहे. निवासस्थानी चहापान आणि चर्चा झाल्यानंतर पालकमंत्री बनसोडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी परभणीला रवाना झाले. यावेळी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्र मंडळ, राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sanjay Bansode  आ.डॉ.गुट्टे यांच्या कार्याची प्रशंसा

गंगाखेड मतदारसंघाचा झपाट्याने होत असलेला सर्वांगीण विकास ही आ.डॉ.गुट्टे यांनी अल्पावधीत केलेली लक्षवेधी कामगिरी आहे. त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे. त्यांच्या प्रयत्नातून या मतदारसंघाचा कायापालट होत आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री बनसोडे यांनी यावेळी आवर्जून काढले.

हेही वाचा 

Back to top button