लातुरात मोबाईलचे शोरुम फोडले, कोट्यावधींचा माल लंपास | पुढारी

लातुरात मोबाईलचे शोरुम फोडले, कोट्यावधींचा माल लंपास

लातूर; पुढारी वृतसेवा : येथील मोबाईल कंपनीचे शोरुम फोडून त्यातील सुमारे अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. येथील मध्यवर्ती बसस्थानका नजीक असलेल्या गांधी मार्केट परिसरात सोमवारी (दि. २८) पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गांधी मार्केट परिसरात बालाजी टेलिकॉम हे मोबाईलचे दुकान आहे. या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून शटर उचकटून चोरटे आत शिरले व दुकानातील विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल हँडसेट, घड्याळे तसेच अन्य साहित्य चोरट्यांनी पळवले. सकाळी हे सारे दृष्टीस पडले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, गांधी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश मकोडे यांच्यासह पोलिस पथकाने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.

Back to top button