Manvat Market Committee Election : मानवत बाजार समिती निवडणुकीत ९९ टक्के मतदान | पुढारी

Manvat Market Committee Election : मानवत बाजार समिती निवडणुकीत ९९ टक्के मतदान

मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदासाठी शनिवारी (ता. १०) झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ९९ टक्के शांततेत मतदान झाले. (Manvat Market Committee Election)

शहरातील मोंढा परिसरात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ४ बूथवर सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया पार पडली .
या निवडणुकीत सहकारी संस्था मतदारसंघात ११, ग्रामपंचायत मतदारसंघात ४ , व्यापारी मतदारसंघात २ तर हमाल व मापारी मतदारसंघात १ अशा १८ जागेसाठी ५९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. (Manvat Market Committee Election)

या निवडणुकीत माजी सभापती पंकज आंबेगावकर यांनी शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण १८ जागी तगडे उमेदवार दिले होते . जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष पंडितराव चोखट बळीराजा विकास पॅनल मध्ये महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांना संधी देऊन लढत चुरशीची बनवली होती . पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तराव जाधव, चंद्रकांत सुरवसे व कारभारी आवचार यांनी एकत्र येत एकूण १५ जागेवर तगडे उमेदवार उभे करीत श्री इंद्रायणी देवी शेतकरी बचाव पॅनल मैदानात उतरविले होते. (Parabhani News)

चोखट यांच्या पॅनेलसाठी खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार बाबाजानी दुराणी यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. पंकज आंबेगावकर गटासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना साकोरे, माजी आमदार मोहन फड व माणिकराव आंबेगावकर, राजेश विटेकर, शिवसेनेचे सईद यांनी शक्ती पणाला लावली होती. तसेच इंद्रायणी देवी पॅनल च्या नेत्यांनी मतदारांशी वैयक्तीक संपर्क साधीत प्रचारात आघाडी घेतली होती.

या निवडणुकीसाठी पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . तहसीलदार पल्लवी टेमकर ही मतदानकेंद्रावर उपस्थित होत्या . निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पाठक व क्षेत्रीय अधिकारी श्री सावंत ही उपस्थित होते .

१५०७ मातदारांपैकी १४९४ जणांनी मतदानाचा हक्क | Market Committee Election

  • सहकारी संस्था मतदारसंघात ४५० मतदारांपैकी ४४९ , ग्रामपंचायत मतदारसंघात ४१३ पैकी ४०९ , व्यापारी मतदारसंघात २९२ पैकी २८८ , हमाल व मापारी मतदारसंघात ३५२ पैकी ३४८ मतदारांनी म्हणजे एकूण १५०७ मातदारांपैकी १४९४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला . सकाळी ७ ते ९ पर्यंत सरासरी १६ टक्के , सकाळी ९ ते ११ पर्यंत ५० टक्के , दुपारी ११ ते १ दरम्यान ८७ टक्के तर दुपारी १ ते ३ दरम्यान ९९ टक्के मतदारांनी मतदान केले.
  •  मतदानप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मोंढा समोरील रस्त्यावर जत्रा भरल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. तिनही पॅनलच्या वतीने मंडप उभारून आलेल्या मतदारांना , कार्यकर्त्यांची थंड पाणी, चहा, नाश्ताची सोय करण्यात आली होती .

Back to top button