बुलढाणा : उकळत्या दुधाच्या कढईत पडल्याने सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू | पुढारी

बुलढाणा : उकळत्या दुधाच्या कढईत पडल्याने सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

बुलढाणा ; पुढारी वृत्तसेवा घराच्या अंगणातील उकळत्या दुधाच्या कढईत पडल्याने गंभीररित्या भाजलेल्या सहा वर्षीय बालिकेचा दुर्देवी मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे मलकापूर शहर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जखमी बालिकेला वाचवण्यासाठी कुटुंबियांनी जळगाव व मुंबई येथे उपचारांची शर्थ केली. अनेक शस्त्रक्रिया केल्या अखेर बालिकेची मृत्यूशी झुंज संपली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर येथील युवराज जाधव यांचा हनुमान चौकात दुध डेअरी व्यवसाय असून, ते नांदूरा मार्गावरील जाधववाडी परिसरात परिवारासह राहतात. दुध आटवून खवा तयार करण्याचा जोड‌व्यवसाय असल्याने जाधव यांच्या घराच्या अंगणात नेहमीच दुध तापवण्याची भट्टी सुरू असते. त्यावर उकळत्या दुधाची कढई ठेवलेली असते. अशातच अंगणात भावंडांसोबत खेळता-खेळता जाधव यांची ६ वर्षीय मुलगी ओमश्री ही अकस्मातपणे उकळत्या दुधाच्या कढईत पडली आणि गंभीररीत्या भाजली गेली. ही दुर्दैवी घटना लक्षात येताच कुटुंबियांनी तीला तात्काळ कढईतून बाहेर काढून स्थानिक रुग्णालयात प्रथमोपचार केले आणि जळगाव व मुंबई येथील हास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

तेथे तीच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या, चिमूरड्या लेकीला वाचवण्यासाठी पित्याने शर्थीचे प्रयत्न केले. ऐन उन्हाळ्यात उकळत्या दुधाने भाजलेल्या ६ वर्षीय ओमश्रीने काल (गुरूवार) अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :  

Back to top button