अंबड कृषी उत्पन्न बाजार समिती : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची सत्ता, १८ पैकी १५ जागा भाजपच्या | पुढारी

अंबड कृषी उत्पन्न बाजार समिती : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची सत्ता, १८ पैकी १५ जागा भाजपच्या

वडीगोद्री,पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप दोन सेना व काँग्रेस एकत्र येऊन राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर करत 18 पैकी 15 जागा मिळवत भाजप सेनेचा झेंडा रोवला आहे. विधानसभा ट्रेलर असलेल्या बाजार समितीच्या आखाड्यात घाटगे व कुचेनी एकत्र येऊन माजी मंत्री राजेश टोपेंची धोबीपछाड केली आहे. महाविकास आघाडी ला तीन जागेवर समाधान मानावे लागले आहे.

अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागे साठी रविवारी ९८. ५१ %  मतदान झाले २४२४  मतदाना पैकी  २३८८ मतदान झाले होते.
सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण मधून शिवाजी ज्ञानोबा कटारे,अवधूत रामराव खडके, बालाजी शिवाजी खोज, धनंजय बाबूराव चावरे, शिवाजी साहेबराव जऱ्हाड, पांडुरंग गोरखनाथ शिंदे, सहकारी संस्था महिला राखीव संगीता पंजाबराव जऱ्हाड, हौसाबाई भगवान डोईफोडे, सहकार संस्था इतर मागास वर्गीय रामकिसन बळीराम जाधव,सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती श्रीराम आनंदराव नागरे, ग्रामपंचायत मतदार संघतून पंजाबराव द्वारकादास सोळुंके,शेखर सखाराम सोळुंके, आर्थिक दृष्टया दुर्बल अरुण आसाराम घुगे,व्यापारी मतदार संघ केदार भवानीदास कुलकर्णी,केदार रामेश्वर राठी,हमाल मापाडी मतदार संघातून श्रीमंत आसाराम खरात हे विजयी झाले तर महाविकास आघाडीचे जगन रुपचंद दुर्गे हे ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मधून निवडून आले आहे. तर फेरमतदाना मध्ये तिघांना समान मते पडल्याने तीन चिट्ट्या टाकून दोन चिट्ट्या काढण्यात आल्या यामध्ये महाविकास आघाडीचेभैय्यासाहेब चंद्रभान हातोटे व  विलास अशोक शिंदे हे विजयी झाले भाजप सेने ला 15 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळाले असून महाविकास आघाडीला तीन जागेवर समाधान मानावे लागले आहे.

गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीवर  भाजप आमदार नारायण कुचे, भाजपाचे सतीश घाटगे,ठाकरे गटाचे हिकमत उढाण व काँग्रेसचे केंदार कुलकर्णी यांनी एकत्र येऊन परिवर्तन घडून आणले.

भाजपकडून मोठा जल्लोष

अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीवरून राष्ट्रवादीला पाय उता करत भाजप सेनेने बाजार समितीची खुर्ची काबीज केल्याने भाजपा,शिवसेनेचे दोन्ही गट व काँग्रेस ने मोठा जल्लोष साजरा केला आहे.

Back to top button