बंधूप्रेम : लहान भावाला विरहातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या भावाने बनवला दिवंगत वडिलांचा मेनाचा पुतळा | पुढारी

बंधूप्रेम : लहान भावाला विरहातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या भावाने बनवला दिवंगत वडिलांचा मेनाचा पुतळा

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : बंधूप्रेम व पितृप्रेमाचे एक अनोखे उदाहरण समाेर आले आहे. चिखली परिसरात दाेन भावातील प्रेमाची सर्व चर्चा हाेत आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या विरहाने मानसिकदृष्ट्या खचलेल्या धाकट्या भावाला सावरण्यासाठी थोरल्या भावाने वडिलांचा हूबेहुब दिसणारा मेनाचा पुतळा भेट दिला. आकस्मिकपणे मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे धाकट्या भावाच्या अश्रूंचा बांध फुटला. शिवाय भावाने दिलेली ह्रद्यस्पर्शी भेट पाहून हा क्षण अनुभवणारा प्रत्येकजण भावूक झाला.

चिखली येथील दिपक विष्णू विनकर हे ग्रामीण भागातील एका शाळेत शिक्षक होते. कोरोना महामारीच्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व भाऊ असा परिवार आहे. थोरला मुलगा शुभम (वय १८) हा डिटीएड चे शिक्षण घेत आहे. तर धाकटा सुमित (वय १४) आठवीच्या वर्गात शिकत आहे. वडिलांच्या मृत्यूमुळे सुमितला मोठा मानसिक धक्का बसला होता. त्याच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊन तो एकटाच बसत होता. त्याचे असे वागणे कुटूंबियांची काळजी वाढवणारे होते.

अखेरीस सुमितला अशा मानसिकतेतून सावरण्यासाठी थोरला भाऊ शुभम याने एक उपाय शोधला. त्याने जयपूर (राजस्थान) येथून वडिलांचा मेनाचा पुतळा तयार करवून आणला. तो पुतळा सुमितला त्याच्या वाढदिवसादिवशी भेट देत बंधूप्रेमासोबतच पितृप्रेमही व्यक्त केले. वडिलांची हूबेहूब प्रतिकृती पाहून तसेच थोरल्या भावाने आपल्यासाठी केलेली ही धडपड पाहून सुमितला अश्रू अनावर झाले.

हेही वाचा :

Back to top button