जालना : उभ्या ट्रकला भरधाव ट्रकची धडक; दोन ठार एक जखमी | पुढारी

जालना : उभ्या ट्रकला भरधाव ट्रकची धडक; दोन ठार एक जखमी

वडीगोद्री ; पुढारी वृत्तसेवा : उभ्या ट्रकला भरधाव ट्रकची धडक बसली. या भीषण धडकेत दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना (शनिवार) १८ सप्टेंबर च्या मध्यरात्री १:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. उभ्‍या ट्रकला भरधाव ट्रकची धडक बसून अपघात झाल्‍याची घटना जालना – वडीगोद्री मार्गावर शहापूर जवळ घडली.

या अपघातात मोहम्मद रफिक इस्माईल (वय ५०) रा. बागेवाडी ता. चित्तापूर जि. कलबुर्गी कर्नाटक, हा जागीच ठार झाला, तर राजू पूर्ण नाव माहीत नाही (वय ३०) रा.गुलबर्गा याचा औरंगाबाद येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तुकाराम वाघमारे (वय ३४) रा.मुळेगाव ता.जि. सोलापूर हा गंभीर जखमी आहे.

शहापूर जवळ मध्यरात्री रोडच्या बाजूला पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला जालन्यावरून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली.

या धडकेत पंक्चर काढत असलेल्या ट्रक जवळ उभ्या असलेल्या दोन जणांना धडक बसली.

या धडकेत एकजण जागीच ठार झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती कळताच गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे व पोलिस कर्मचारी यांनी येऊन मृत व जखमीस अंबड येथे हलविण्यात आले.

दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. त्यातील एक जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून, एकावर औरंगाबाद येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहा व्हिडिओ : मुंबईचा प्रसिद्ध गिरगावचा महागणपती असा साकारला जातो

Back to top button