दिव्‍या अग्रवाल ठरली बिग बॉस ओटीटीची विजेती | पुढारी

दिव्‍या अग्रवाल ठरली बिग बॉस ओटीटीची विजेती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिग बॉस ओटीटी शोमध्‍ये दिव्‍या अग्रवाल हिने बाजी मारली आहे. दिव्‍या अग्रवाल ही बिग बॉस ओटीटी शोची विजेती ठरली आहे. ग्रँड फिनालेमध्‍ये तिने शमिता शेट्‍टी, राकेश बापट, निशांत भट्‍ट आणि प्रतीक सहजपाल यांना पिछाडीवर टाकत बिग बॉसची ट्रॉफी व २५ लाख रुपयांचे बक्षीस पटकावले, अशी माहिती अभिनेत्री गौहर खान हिने ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून दिली आहे.

बिग बॉस ओटीटी शोमध्‍ये निशांत भट आणि शमिता शेट्‍टी हे उपविजेता ठरले.बिग बॉस ओटीटी शोमध्‍ये विजेती ठरलेल्‍या दिव्‍या अग्रवालला शुभेच्‍छा. शमिता शेट्‍टी आणि निशांत भट्‍ट यांनीही या शाेमध्‍ये चांगले प्रदर्शन केले, असे गौहर खान हिने म्‍हटले आहे.

बिग बॉस ओटीटी हा शो सहा आठवडे चालला.

अंतिम फेरीत दिव्‍याचा मुकाबला शमिता शेट्‍टी, राकेश बापट, दिव्‍या अग्रवाल, प्रीतक सहजपाल आणि निशांत भट्‍ट यांच्‍याशी होता.

या पाच स्‍पर्धांमध्‍ये कोण बाजी मारणार, याची चाहत्‍यांमध्‍ये प्रचंड उत्‍सुकता होती.

शमिता शेट्‍टी किंवा प्रतीक सहजपाल हेच हा शो जिंकतील, अशी चर्चा होती. तेच विजेतापदाचे दावेदार होते.

मात्र मोठ्या प्रमाणावर चाहत्‍यांमुळेच दिव्‍या अग्रवालने बाजी मारली.

बिग बॉसमध्‍ये शमिता शेट्‍टीबरोबरील तिचा संघर्ष हा चर्चेचा विषय ठरला होता.

राकेश बापट, निशांत भट आणि मुस्‍कान जट्‍टानाबरोबरील तिची मैत्रीही चर्चेत होती.

या शोमध्‍ये ब्रीफकेस घेणारा प्रतीक सहजपाल हा आता बिग बॉस १५ मध्‍ये पोहचला आहे. अभिनेता सलमान खानचा हा शो १५ ऑक्‍टोबरपासून सुरु होणार आहे. ग्रँड फिनालेमध्‍ये अभिनेता रितेश देखमुख आणि त्‍याची पत्‍नी, अभिनेत्री जेनेलिया हेही उपस्‍थित होते.

दिव्‍याने केला खडतर प्रसंगांचा सामना

बिग बॉस ओटीटी शो ८ ऑगस्‍ट २०२१ रोजी सुरु झाला. सुमारे एक हजार तास लाईव्‍ह चालेल्‍या या शोचे सूत्रसंचालन दिग्‍दर्शक करण जौहर याने केले.

बिग बॉस ओटीटी शोच्‍या सुरुवातीपासून दिव्‍या अग्रवाल हीन स्‍वत:ला मानिसक दृष्‍ट्या कणखर ठेवले.

या शोमध्‍ये तिला अनेक खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागले; पण ती विलचित झाली नाही.

मला वाटतं माझं व्‍यक्‍तिमत्त्‍व पूर्णपणे वेगळे आहे. मी एक कणखर आहे. मला मानिसक दृष्‍ट्या कमकूवत करणे खूप कठीण आहे, असे दिव्‍याने म्‍टहलं आहे.

यापूर्वी दिव्‍याने ‘एमटीवी स्‍पेस सीजन १’चीही विनर ठरली होती तर एमटीव्‍ही स्‍प्‍लिट्‍सविला स्‍पर्धेचे उपविजेतेपद तिने पटकावले होते.

हेही वाचलं का ? 

 

 

 

Back to top button