बीड : सैफोद्दीन इनामदार यांची फिफा वर्डकपमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड | पुढारी

बीड : सैफोद्दीन इनामदार यांची फिफा वर्डकपमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड

बीड, पुढारी वृत्तसेवा : केज येथे पोलीस सेवेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेले अमिरोद्दीन इनामदार यांचे चिरंजीव सैफोद्दीन इनामदार यांनी ज्ञानाच्या बळावर गरूड झेप घेतली आहे. संपूर्ण जगाची उत्कंठा ताणलेल्या फिफाच्या जागतिक फुटबॉल स्पर्धेसाठी त्यांची अन्न-सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली आहे. ही केज तालुका आणि बीड जिल्हा नव्हे तर देशासाठी अभिमानाची बाब आहे.

या बाबतची माहिती अशी की, सैफोद्दीन ईमानदार यांची कतार येथे पार पडणाऱ्या जागतिक स्तरावरील फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेसाठी अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली आहे. देश-विदेशातून येणारे खेळाडू यांच्या जेवणावर लक्ष्य देण्यासाठी सरकारच्या वतीने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

सैफोद्दीन इनामदार यांचे प्राथमिक शिक्षण केज येथे तर माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई येथे झाले आहे. तर बी. टेक. पदवीचे शिक्षण एम. जी. एम. कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी (अन्न तंत्र) येथून प्राप्त केले आहे. त्यांनी वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध स्पर्धामध्ये सुवर्ण, कांस्य पदकपटकावले असून विविध स्पर्धेतून सुमारे पन्नास पेक्षा जास्त बक्षिसे आणि प्रशस्तीपत्रे प्राप्त केलेली आहेत. त्यांच्या कतार येथील निवडी बद्दल त्यांचा केज येथील आदर्श पत्रकार संघ, सक्रिय पत्रकार संघ आणि डिजिटल पत्रकार संघ या पत्रकारांनी सैफोद्दीन इनामदार यांचा सत्कार केला.

हेही वाचलतं का?

Back to top button