

पुढारी ऑनलाईन डेस्क : 2012 मध्ये दिल्लीतील छावला भागात एका 19 वर्षीय तरुणीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 2014 मध्ये दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. दोषींना दयामाया केली जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. पण, आता सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (२६ नोव्हेंबर) ७ वर्षे जुन्या खटल्यातील दोषींची निर्दोष मुक्तता केली. (Chhawla Rape Case)
गुरुग्राम सायबर सिटीमध्ये काम करणाऱ्या या तरुणीचे ९ फेब्रुवारी 2012 रोजी रात्री दिल्लीतील कुतुब विहार येथील घराजवळून कारमधून तिघांनी अपहरण केले होते. यानंतर छिन्न विछन्न अवस्थेतील तरुणीचा मृतदेह तीन दिवसांनंतर रेवाडीच्या रोडाई गावातील शेतातून सापडला होता. मृत तरुणीच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या आणि तिच्यावर कारमधील अवजारांसह वस्तूंच्या सहाय्याने तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. पीडित तरुणीने आरोपी सोबत शरीरसंबध ठेवण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी तिच्या विरुद्ध कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले होते. (Chhawla Rape Case)
मुलीच्या अपहरणाच्या वेळी प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी लाल रंगाच्या कारची झडती घेतली. काही दिवसांनी त्याच वाहनात फिरत असताना राहुल याला पोलिसांनी पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली देत त्याचे दोन साथीदार रवी आणि विनोद यांचीही माहिती दिली. तिघांच्या सांगण्यावरूनच पीडितेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता.
डीएनए अहवाल आणि इतर सर्व पुराव्यांवरून तिघांविरुद्धचा खटला कनिष्ठ न्यायालयात निर्विवादपणे सिद्ध झाला. यापूर्वी 2014 मध्ये ट्रायल कोर्टाने हा खटला 'रेरेस्ट ऑफ द रेरेस्ट' श्रेणीतील असल्याचे लक्षात घेऊन तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. नंतर दिल्ली उच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला होता. (Chhawla Rape Case)
या प्रकरणात अॅमिकस क्युरीची स्थापना झाली. ज्येष्ठ वकील सोनिया माथूर यांनी न्यायाधीशांना विनंती केली होती की, या दोषींना सुधारण्याची शक्यता विचारात घ्यावी. ते म्हणाले होते की, दोषींपैकी एक 'विनोद' हा बौद्धिक अपंगत्वाने ग्रस्त आहे. त्याला नीट विचार करता येत नाही. दोषींबाबत सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन बाळगावा, अशी विनंती ज्येष्ठ वकिलाने न्यायालयाला केली होती.
'मी पराभूत झाले'
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर रडणाऱ्या पीडितेच्या आईचे हे शब्द आहेत, जीने आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी 10 वर्षे अनेक कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या. गँगरेप आणि हत्येशी संबंधित हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ मानून कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाने तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र 10 वर्षे जुन्या या खटल्याचा निकाल बदलताना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
'जगण्याला काहीच अर्थ राहिला नाही'
दिल्लीतील 10 वर्षीय छावला बलात्कार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील तिन्ही दोषींची निर्दोष मुक्तता केली. हा निर्णय ऐकून सर्वांनाच धक्का बसला. पीडितेच्या आईने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपला पराभव म्हटले आहे. ती म्हणाली की 'मी हरले, या निर्णयासाठीच आम्ही जिवंत होतो. पण, आता आम्ही पराभूत झालो. आम्हाला आशा होती की आमच्या मुलीला न्याय मिळेल. मात्र, या निर्णयानंतर आता जगण्याला काहीच अर्थ राहिला नाही'.
पोलिसांचा निष्काळजीपणा ठरला कारणीभूत
सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही दोषींना दोषमुक्त करण्यात पोलिसांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हणाले की, न्यायालये भावनांच्या आधारे नव्हे, तर पुराव्याच्या आधारे निर्णय घेतात. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, आरोपींना त्यांचे म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी मिळाली नाही.
क्रूरतेचा कळस
बदमाशांनी मुलीला हरियाणाला नेण्याचा निर्णय घेतला. गाडीत डांबून पीडितेचा छळ करण्यात आला. तेथे पोहोचताच तिघांनी दारू खरेदी केली आणि नंतर कार निर्जन ठिकाणी नेऊन दारू पिऊन पीडितेचा छळ सुरू केला. या तिघांनी पीडितेच्या शरीराची अक्षरशा: विटंबना केली. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेण्यात आला होता. डोक्यात घागरीने जोरात मारहाण करण्यात आली होती. या शिवाय कारमधील अवजारांना तापवून तिच्या शरीरावर चटके देण्यात आले होते. तिचा चेहरा पूर्णपणे विद्रुप करण्यात आला होता. इतक्या छळानंतर पीडितेचा जागीच मृत्यू झाला होता. तरीही हे नराधम तिच्या शरीराची विटंबना करण्याचे थांबत नव्हते. क्रूरतेचा कळस म्हणजे पीडितेच्या गुप्तांगात बाटली फोडून घुसवण्यात आली होती. तिचे डोळे फोडून त्यात कारमधील ॲसिड ओतण्यात आले होते.
अधिक वाचा :