कुत्रा नव्हे तर भाऊच भावाला चावला! | पुढारी

कुत्रा नव्हे तर भाऊच भावाला चावला!

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे एका पेशाने शिक्षक असलेल्या भावास त्याच्या भावाने कडकडून चावा घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवार (दि.१९) रोजी घडली.

या बाबतची माहिती अशी की चिंचोली माळी येथील मूळ रहिवाशी असलेले कमलाकर बन्सीधर गलांडे हे सहशिक्षक आहेत. ते सध्या स्वराज्य नगर अंबाजोगाई येथे रहात आहेत. कमलाकर बन्सीधर गलांडे हे त्यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडच्या आजू बाजूचे गवत काढत असताना त्यांचा भाऊ प्रकाश बन्सीधर गलांडे व भावजई कविता प्रकाश गलांडे यांनी कमलाकर बन्सीधर गलांडे यांना तुझा येथे काय संबंध आहे. येथे गवत काढायचे नाही. असे म्हणुन शिवीगाळ केली. कमलाकर गलांडे यांना त्यांचा सख्खा भाऊ प्रकाश गलांडे यांच्या पाठीवर डाव्या बाजुस तोंडाने चावा घेतला. तसेच जर पोलीस स्टेशनला तक्रार दिली; तर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करुन जिवे मारुन टाकण्याची धमकी दिली.

कमलाकर गलांडे यांनी २६ ऑक्टोबर रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून प्रकाश बन्सीधर गलांडे व कविता प्रकाश गलांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू गुंजाळ हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button