नांदेड : दरोडेखोरांची टोळी बिटरगाव पोलिसांनी केली जेरबंद | पुढारी

नांदेड : दरोडेखोरांची टोळी बिटरगाव पोलिसांनी केली जेरबंद

उमरखेड; पुढारी वृत्तसेवाः बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच दरोडेखोरांना गावकर्‍यांच्या मदतीने पोलिसांनी जेरबंद केले आहे. सोमवारी (दि,२७) मध्यरात्रीच्या सुमारास बिटरगाव, पिंपळगाव, जेवली परिसरात धुमाकुळ घालुन पसार होण्याच्या तयारीत होते. हे पाचही दरोडेखोर, शेजारील हिमायतनगर (जि, नादेड) येथील रहिवासी असुन, मागील काही दिवसांपासुन या घरफोडीच्या गुन्ह्ंयामध्ये वाढ झाल्यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी  मोठी मदत होणार आहे.

सोमवारी( दि,२६) मध्यरात्रीनंतर सात ते आठ दरोडेखोरांच्या टोळीने बिटरगाव येथील शेख शबिर शेख हनिफ यांच्या घराचा कुलुप तोडुन  घरात प्रवेश केला. दरम्यान आवाजाने जागे झालेल्या, शेख शबिर  यांच्यावर, रॉड व कु-हाडीने वार करून जीव घेणा हल्ला केला. तसेच त्यांच्या घरातील दागदागीने व पत्नीच्या गळयातील  दागिणे असा एकुण ५४ हजार रूपयांचा  मुद्देमाल बळजबरीने हीसकावुन घेवुन पळुन गेले.

त्यानंतर बिटरगावातील राजु गुलाबराव देवकते यांचे दीड हजार रुपये, शेख सुफीया शेख यांचे गळयातील सोन्याची पोत अंदाजे ३५ हजार रुपये, संजय गंगाराम बुटले यांचे एक हजार  रूपये व हनुमान मंदीर येथील दानपेटी फोडुन ३ हजार रुपये असे एकुण ९४,५०० रु मद्देमाल जबरीने लुटला, तसेच जाताजाता  पिंपळगाव फाट्यावरील  वनविभाग चौकीवर हजर असलेले वन कर्मचारी राजु देवकते यांचेवर दगडफेक करून   वनविभागाच्या चौकीची तोडफोड करून येथील साहित्याची नासधुस केली. आपली कामगिरी उकरून पिपळगाव मार्गे पैनगंगानदी पल्ह्याड पसार होण्याच्या प्रयत्नातील या डोळक्याचा तेथील जागरूक गावकरी व पोलीस मित्रांनी पाटलाग केला.तसेच  गावकर्‍यांनी  लागलीच ही माहिती  ठाणेदार प्रताप भोस यांना दिली.बोस यांनी स्टाॅफसह घटनास्थळ गाठले. फरार झालेल्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यासाठी, गांजेगाव पुल व पिपळगाव पुल येथे नाकाबंदी लावण्यात केली. घरफोडी कराणारे ७ इसम हे घरफोडी करून पैदल येताना पिपळगाव पुल येथे दिसताच दबा धरून बसलेल्या पोलीसानी त्यांचेवर झडप टाकली. त्यामधील इसमा कडे कु-हाड, चाकु, लोंखडी रॉड व दगड होते. त्यानी पोलीसावर हमला करण्याचा प्रयत्न केला असता. पोलीसानी हमला चुकवुन ५ ते ७ आरोपी पैकी ३ आरोपीना बिटरगाव व पिपळगाव येथील पोलीस मित्र यांचे मदतीने जागीच पकडले व ४ आरोपी हे पळुन गेले. पळुन गेलेल्या आरोपी शोध कामी दोन पथके रवाना केली. एक पथक गांजेगावकडे व एक पथक जेवली पिपळागावं येथे रवाना केले. गांजेगावकडील पथकानी गांजेगाव येथील पोलीस मित्र यांचे मदतीने दोन आरोपी पकडले. एकुण पाच जणांना पकडण्यात पोलीसांना यश आले.

पकडलेल्या दरोडेखोरांमध्ये जाकी बावाजी चव्हाण ( रा. सोनारी ता. हीमायतनगर जि. नांदेड). मांगीलाल श्रीरंग राठोड (रा. हिमायतनगर जि.नांदेड) विकास श्रीरंग राठोड ,( रा. हिमायतनगर जि. नांदेड), निलेश गब्बरसींग राठोड (रा हदगाव जि.नांदेड), दत्ता मांगीलाल राठोड (रा. गणेशवाडी ता. हिमायतनगर जि.नांदेड)  यांचा समावेश आहे.  या दरोडेखोरांकडून गुन्हयात वापरलेले तीन चाकु, १ रॉड, एक कु-हाड, दोन मोबाईल किमंत २०हजार रूपये गुन्हयात चोरी गेलेल्या मालापैकी २२ तोळच्या चांदीचे गंठण किमंत २०हजार रू १ जोडवे किमंत २हजार रू व ७ ग्राम सोन्याचा गळातील हार असा एकुण ७७हजार रु चा माल हस्तगत करण्यात आला आहे.या टोळक्याच्या अटकेमुळे, गेल्या सहा महिन्यापासुन, ब्राम्हणगाव, चातारी, सिंदगी, मानकेश्वर परिसरात घालेल्या घरफोड्या व दखोड्याची प्रकरणे उघडकिस येण्यात मोठा हातभार लागणार आहे.

हेही वाचा

Back to top button