परभणी: ‘आई राजा उदो उदो’ ने राणीसावरगाव दुमदुमले | पुढारी

परभणी: ‘आई राजा उदो उदो’ ने राणीसावरगाव दुमदुमले

राणीसावरगाव, पुढारी वृत्तसेवा : येथील रेणुका देवी मंदिरात नवरात्रौ त्सवानिनिमित्त सोमवारी (दि.26) हर्षोल्हासात घटस्थापना करण्यात आली. यावेळी आई राजा उदो…उदो, या जयघोषणेने मंदिर परिसर दुमदुमला.

चारही बाजुंनी डोंगर असून तीन जिल्हयाच्या मधोमध राणीसावरगाव गाव आहे. येथे दररोज सकाळी 4 वाजेपासून गावातील भक्त मूळपीठ देवीचे दर्शन घेवून नंतर खाली असलेल्या रेणुका देवीच्या दर्शनाला येतात. कर्नाटक, आंध्र प्रदेश, हैदराबाद येथून भाविक दर्शनास येतात. अष्टमीला (दि.3) रात्री होमहवन, दि. 5 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता दसरा पालखी मिरवणूक, दि.6 ऑक्टोबर रोजी रात्री गोंधळाने उत्सव सांगता होईल.

दसर्‍याला सीमोलंघनसाठी पालखी सोहळा माळावरील मूळपीठ देवीला जावून तेथून गावात येवून मंदिरात आणला जातो. गावातून पालखीत बसलेला परशुराम यांच्या मूर्तीला भगिनी ओवाळणी करतात. श्री संत चुडामणी महाराज अहमदपूर येथून पायी पालखी सोहळा येथे येतो. जवळपास 4 ते 5 हजार भाविक पायी येतात. येथे गळाकाटू घराणे (विश्‍वस्त) म्हणून काम पाहत असतात.
पालखी उचलण्याचा मान भोई समाजाला असून ते पालखी घेऊन जातात. गावातील मानकरी, सेवेकरी व इतर मनोभावे सेवा करतात. रेणुका देवी संस्थान अध्यक्ष म्हणून बाबुराव गळाकाटू हे काम पाहत असून त्यांना सहकार्यासाठी दुसरे तीन विश्‍वस्त आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button