औरंगाबाद : चनकवाडीतील युवकाचा संशायास्पद मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : चनकवाडीतील युवकाचा संशायास्पद मृत्यू

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील चनकवाडी येथील एका (३५ वर्षीय) युवकाचा शुक्रवारी रात्री गळफास लावल्‍याने मृत्यू झाला. सदरील मृतदेह आज (शनिवारी) सकाळी नातेवाईकांनी परस्पर रुग्णालयात आणल्यामुळे पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त करून अधिक तपास सुरू केला आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सुभाष जनार्दन कानुले (रा. चनकवाडी, ता. पैठण) असे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील चनकवाडी येथील सुभाष जनार्दन कानुले (वय ३५ वर्ष) या युवकाने घराच्या परिसरात आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) उघडकीस आली. सदरील घटना पोलिसा़ंना न कळविता परस्पर मृतदेह नातेवाईकांनी पैठण येथील शासकीय रुग्णालयात आणल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी डॉ विशाल नेहुल यांना या विषयी माहिती दिली. त्‍यांनी आपल्या पथकासह शासकीय रुग्णालयात जाऊन मृतदेहाची पाहणी केली.

सदरील तरुणाचा मृत्यू संशयास्पद झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पैठण पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सदरील तरुणाने आत्महत्या का केली. तसेच या संदर्भात पोलिसांना माहिती न दिल्यामुळे नातेवाईकांकडून अधिक तपास सुरू केला आहे. सायंकाळपर्यंत या घटनेचा उलगडा होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

हेही वाचा : 

Back to top button