बीड : ट्रॅव्हल्स- रिक्षाच्या भीषण अपघातात १ ठार, ९ जखमी | पुढारी

बीड : ट्रॅव्हल्स- रिक्षाच्या भीषण अपघातात १ ठार, ९ जखमी

गेवराई: पुढारी वृत्तसेवा: आरणहून गायकवाड जळगाव येथे ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या रिक्षाला ट्रॅव्हल्सने आज (दि.२०) पहाटे तीन वाजता जोराची धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर नऊ जण जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर जवळील ईटकूर फाट्यावर घडली.

गेवराई तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील काही भाविक आरणहून आपल्या गावाकडे ज्योत घेऊन जात होते. पहाटे तीन वाजता भाविकांच्या रिक्षाला ट्रॅव्हल्सने (एमएच 20 ईजी 0055) जोराची धडक दिली. या अपघातात हनुमंत अण्णासाहेब आगरकर (वय 4२) हे जागीच ठार झाले. तर विश्वंभर देवीदास अंतरकर, शैलेश जानकीराम कातखडे, ऋषिकेश परमेश्वर आगरकर, महादेव बबन जावळे, परमेश्वर पांगरे, रविराज भाऊसाहेब आगरकर, गजानन बंडू वाघमारे, नंदू भाऊसाहेब आगरकर, बाळू भारत आगरकर हे जखमी झाले. जखमींना बीड शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button