नांदेड : उमरी तालुक्यात अवकाळी पावसाने दळणवळण, वीजपुरवठा ठप्प | पुढारी

नांदेड : उमरी तालुक्यात अवकाळी पावसाने दळणवळण, वीजपुरवठा ठप्प

उमरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील काही भागाला मान्सूनपूर्व पावसाने आज (दि.२६) झोडपून काढले. सायंकाळच्या सुमारास वादळ, वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात सुमारे अर्धा तास पाऊस कोसळला. यामुळे दळणवळणासह, वीजपुरवठा ठप्प झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

आज सायंकाळी ४ च्या सुमारास तालुक्यातील धानोरा (बु), बोळसा (बु), मंडाळा, सावरगाव (कला ) परिसरात अचानक वारे सुटले. तेवढ्यात जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यावेळी धानोरा (बु), बोळसा (स्टेशन) आदी गावातील विजेचे खांब आडवे झाले. अनेक घरावरील पत्रे उडून गेली. अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. तर एक मोठे झाड उमरी – धानोरा रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

धानोरावाडी येथील माधव कुषनूरे यांच्या शेतातील चिकनगोणी झाड वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडले. या झाडाला कुषनूरे यांची बैलजोडी बांधली होती. सुदैवाने झाड दोन्ही बैलांच्या मधोमध पडल्याने बैलाला कोणत्याही इजा अथवा हानी पोहोचली नाही.

हेही वाचलंत का ? 

Back to top button