हिंगोली : भरधाव टेम्पोच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू | पुढारी

हिंगोली : भरधाव टेम्पोच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरालगत कारवाडीजवळ भरधाव टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) दुपारी घडली. सुधाकर रामराव गीते (वय ४२, रा. भोगाव, ता. हिंगोली) असे मयत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील भोगाव येथील सुधाकर गीते हे पाटण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज दुपारच्या सुमारास गीते हे कारवाडी रस्त्याने त्यांच्या दुचाकीवरून हिंगोली शहराकडे येत होते. यावेळी हिंगोली शहराकडून अकोला वळण रस्त्याने जाणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये गीते यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. गीते यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. तर अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात आले. तसेच टेम्पोमधील चार ते पाच मजूर देखील जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button