परभणी : बेलखेडा येथे ७५ वर्षीय अंध वृद्धेवर बलात्कार

परभणी : बेलखेडा येथे ७५ वर्षीय अंध वृद्धेवर बलात्कार

परभणी : पुढारी वृत्तसेवा

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामधील बेलखेडा येथे भिक्षा मागून खाणाऱ्या ७५ वर्षीय अंध वृद्धेवर अमानुष बलात्कार झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

पीडित वृद्धा बेलखेडा गावात भिक्षा मागून स्वत:चा उदरनिर्वाह करते. १० वर्षांपूर्वी तिच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाले पासून ती वृद्धा अंध आहे. नेहमी प्रमाणे रात्रीचे जेवण करुण घरात वृद्धा झोपली होती. रात्री अचानक घराचे कोणी तरी दार वाजवले. वृद्धेने दार कोण वाजवत आहे अशी विचारणा केली. परंतु, कोणीही आवाज दिला नाही. भीतीने वृद्धाने दार उघडले नाही. पण, दार ढकलून एक व्यक्ती घरात शिरली.

घरात शिरलेल्या व्यक्तीने वृद्धेला ढकलून दिले. त्यावेळी वृद्धा चुलीवर जावून पडली. तसेच त्या व्यक्तीने वृद्धेला हिंदी भाषेत शिवीगाळ केली. नंतर वृद्धेवर बळजबरी करीत बलात्कार केला. शिवाय या गोष्टीची वाच्यता केल्यास मारुन टाकण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

या घटनेची खंभीर दखल घेत पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

हे देखिल वाचा :

पाहा व्हिडिओ : हेमांगी कवी ब्रा आणि बुब्जवर का बोलली?

https://youtu.be/pwbK_–MP4s

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news