अजूनही बरसात आहे : भूतकाळ आणि वर्तमान काळाची सांगड घालणारी कथा | पुढारी

अजूनही बरसात आहे : भूतकाळ आणि वर्तमान काळाची सांगड घालणारी कथा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अजूनही बरसात आहे : भूतकाळ आणि वर्तमान काळाची सांगड घालणारी कथा सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतेय. अजूनही बरसात आहे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. मुक्ता आणि उमेश यांची जोडी प्रेक्षकांना आवडत असून या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं आहे. या जोडीला छोट्या पडद्यावर पाहायला प्रेक्षकांना आवडतंय.

अधिक वाचा –

या मालिकेत मीरा आणि आदिराज यांचे काही फ्लॅशबॅक सीन्सही पाहायला मिळताहेत. त्यात ती दोघं आपल्या वयापेक्षा १० वर्षं लहान वयाची भूमिका करताना दिसतात.

अधिक वाचा- 

लहान वयाची भूमिका साकारणं आव्हात्मक नक्कीच आहे. उमेशला तरुण दिसण्यासाठी क्लीन शेव करावं लागतं आणि त्यापुढचे काही दिवस तो वर्तमान काळातलं चित्रीकरण करू शकत नाही.

मुक्ता आणि उमेश जोडीला प्रेक्षकांचं उदंड प्रेम

मुक्ताचाही शॉर्ट हेअर लूक आणि शर्ट-जीन्स असा पेहराव फ्लॅशबॅक एपिसोड्समध्ये पाहायला मिळतो.

अधिक वाचा-  

या सर्व चित्रीकरणासाठी संपूर्ण टीमचा कस पणाला लागतो आणि उत्तम टीमवर्कमुळेच हे इतक्या छान प्रकारे होऊ शकतं.

मुक्ता आणि उमेश म्हणजेच आदिराज आणि मीरा या जोडीला प्रेक्षकांचं उदंड प्रेम मिळतं आहे.

पाहा, ‘अजूनही बरसात आहे’, सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

अधिक वाचा – 

पाहा व्हिडिओ  – “जेव्हा मुंबईची पोरगी कोकणात जाते” येवा कोकण आपलाच असा! | Let’s see beauty of konkan

 

Back to top button