पुण्यातील निर्बंध अजून शिथील करण्याचे अजित पवारांनी दिले संकेत

अजित पवार
अजित पवार

पुण्यातील निर्बंध अजून शिथील करण्याबाबत सकारात्मक संकेत अजित पवार यांनी दिले. पुण्यात सध्या सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी चार पर्यंत दुकाने सुरू आहेत.

मात्र सर्वांनी संध्याकाळी सात पर्यंत दुकाने खुली करण्याबाबत मागणी केली आहे, त्यानुसार पुण्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय सोमवारी मंत्रालयात घेतला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर पवार झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते. यावेळी पुण्यातील निर्बंध अजून शिथील करण्याबाबत अजित पवरांनी वक्तव्य केले.

जिल्हा प्रशासनाचे काम चांगले

पवार म्हणाले, पुण्याचा कोरोना बाधित दर हा ३.९ एवढा आहे. सध्या पुण्यातील निर्बंध हे तिसऱ्या लेव्हलचे आहेत. तिसऱ्या लाटेचा दृष्टीने काम सुरू आहे, जिल्हा प्रशासनाने चांगली काम केले आहेत. शासनाने दुसऱ्या लाटेत झालेली सर्वाधिक रुग्णवाढपेक्षा तिसऱ्या लाटेत दीडपट रुग्ण होण्याचा अंदाज ठेवून बेडचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत.'

अजित पवार पुढे म्हणाले की, 'कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना काही सवलती देण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सवलत दिल्याने ज्यांनी लस घेतली नाही ते लस घेण्यास पुढे येऊ शकतील.'

पुण्यातील २३ दरडप्रवण गावांचे होणार स्थलांतर

शासनाकडून दरडप्रवण गावे जाहीर केली जातात, त्यामध्ये पुण्यातील २३ गावांचा समावेश आहे. या गावातील नागरिकांकडून आमचे दुसरीकडे स्थलांतर करा अशी मागणी प्रशासनाकडे होण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन तीन दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमुळे हे नागरिक स्थलांतराची मागणी करत आहेत.

यापूर्वी त्यांचा स्थलांतराला तयार होत नव्हते, आमची शेती, घर येथे असल्याचे ते म्हणत होते. त्यामुळे आता ही गावे स्थलांतरित करण्याचा विचार सुरू आहे.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : सह्याद्रीतील अनोखा हिरवा बेडूक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news