जिंतूर तालुक्यातील निवळी धरण ओव्हरफ्लो | पुढारी

जिंतूर तालुक्यातील निवळी धरण ओव्हरफ्लो

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा :

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा मध्यम प्रकल्प धरण ( निवळी धरण ) मागील दोन दिवसाच्या पावसाच्या पाण्याने ओव्हरफ्लो झाले. गेल्या २४ तासापासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

बोरी व परिसरात २१ व २२ जुलै रोजी दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हाजरी लावली. त्यामुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामध्ये निवळी येथील करपरा मध्यम प्रकल्प धरण हे पूर्णपणे भरल्यामुळे ओव्हरफ्लो झाले.

पाणी ऑव्हरफ्लो परिसरातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून हजार हेक्टर पिंकाचे नुकसान झाले. करपरा नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांना मोठा प्रमाणात फटका बसला आहे. यामध्ये निवळी खुर्द, निवळी बुद्रुक, कौसडी, कडसावंगी, चांदज नागापूर,बोरी, देवगाव धानोरा, नागनगाव, बोर्डी, डोहरा, आसेगाव, दुधगाव या गावांचा समावेश आहे.

पूर आल्याने या गावांमधील हजारो हेक्टर शेतीचे पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. कापूस, मूग, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे स्थानिक प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : लेस्बीयन, गे, ट्रन्सजेंडर नेमके असतात काय?

Back to top button