कोल्हापूर : दहा वर्षे केवळ एकाचीच मन की बात; आदित्य ठाकरेंची उचगावच्या सभेत टीका | पुढारी

कोल्हापूर : दहा वर्षे केवळ एकाचीच मन की बात; आदित्य ठाकरेंची उचगावच्या सभेत टीका

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : व्यक्तिकेंद्रित सत्तेमुळे दहा वर्षे केवळ त्या व्यक्तीची ‘मन की बात’ झाली; मात्र इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर ‘जन की बात’ होऊन सर्वसामान्यांशी संवाद साधला जाईल, अशी ग्वाही युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. महाविकास आघडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ उचगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही हिंदुत्व सोडले नाही. हृदयात राम आणि हाताला काम असे आमचे हिंदुत्व आहे. घर पेटविणारे हिंदुत्व हवे की चूल पेटविणारे, हे जनतेने ठरवावे. 400 पारचा दावा करणार्‍यांना 200 जागा मिळतील की नाही, अशी स्थिती आहे; कारण साऊथ से साफ आणि नॉर्थ से हाफ अशी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची अवस्था आहे. दहा वर्षांत केलेल्या जुमल्यांचे नाव आता गॅरंटी असे ठेवले आहे. शाहू महाराज यांना बिनविरोध करून संसदेत पाठवायला हवे होते; मात्र महायुतीने येथे उमेदवार दिला. यावेळी खा. चंद्रकांत हंडोरे आ. ऋतुराज पाटील, शाहू महाराज यांची भाषणे झाली.

Back to top button