

चंदगड : पुढारी वृत्तसेवा : बेळगाव- वेंगुर्ला रस्त्यावरील शिनोळी फाट्यावर झालेल्या अपघातात तडशिनहाळ (ता. चंदगड) येथे एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव रमेश शिवाजी कडोलकर (वय ३४ ), तर जखमी युवकाचे नाव जक्काप्पा हुंद्रे (रा. कुद्रेमनी ता. जि. बेळगाव ) असे आहे.
रमेश हा शिनोळी येथील एका कंपनीत नोकरीला होता. काम आटोपून तो आपल्या गावी येत असताना एका भरधाव टेम्पोने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये रमेश याचा जागीच मृत्यू झाला. तर रमेशच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेला जक्काप्पा हुंद्रे हा गंभीर जखमी झाला. जखमीला तात्काळ बेळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रमेशच्या मागे पत्नी, दोन मुली, आई, भाऊ व बहीण असा परिवार आहे.
हेही वाचा