यंदा वार्षिक बाजार मूल्यदरात कोणतीही वाढ नाही | पुढारी

यंदा वार्षिक बाजार मूल्यदरात कोणतीही वाढ नाही

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक वर्षी १ एप्रिलरोजी शासनाच्या मुद्रांक विभागाकडून नवीन वार्षिक बाजार मूल्य दर निश्चित करून त्याची अंमलबजावणी केली जाते. यावर्षी वार्षिक बाजार मूल्य दरामध्ये काही बदल होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये वार्षिक बाजार मूल्य दरामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. सन २०२३-२४ चे बाजार मूल्यदर पुढे कायम ठेवण्यात आले आहेत.

मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तथा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (महाराष्ट्र राज्य, पुणे) हे आर्थिक वार्षिक बाजार मुल्यदर तक्ते तयार करतात. महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य निश्चित करणे) नियम, १९९५ मधील नियम ४ च्या उप- नियम (९) च्या तरतुदी अन्वये उप सचिव यांना वर्ष २०२३-२४ चे वार्षिक दर विवरणपत्र कोणताही बदल न करता वर्ष २०२४-२५ मध्ये चालू ठेवण्यात यावे, असे कळविण्याचे शासनाचे निर्देश असल्याचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

सन २०२२-२३, २०२३-२४ व आता १ एप्रिलपासून २०२४-२५ सालासाठी तेच वार्षिक बाजार मूल्य दर कायम राहणार आहेत. तीन वर्ष वार्षिक बाजार मूल्य दरामध्ये कोणताही बदल झालेले नाहीत.

हेही वाचा 

Back to top button