कोल्हापूर जिल्ह्यात २६ मार्चपर्यंत बंदी आदेश | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात २६ मार्चपर्यंत बंदी आदेश

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 26 मार्चपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मंगळवार दि. 12 मार्च रोजी सकाळी सात वाजल्यापासून हा आदेश लागू होणार आहे. अप्पर जिल्हादंडाधिकरी संजय तेली यांनी हा आदेश काढला आहे.

जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता मोर्चा, उपोषण आदीद्वारे विविध प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. जिल्ह्यात यात्रा, उरूस, सण मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता हा आदेश लागू केला आहे.

Back to top button