Hasan Mushrif On A. Y. Patil: ए.वाय. पाटील यांनी राजकीय आत्मघात करुन घेतला : हसन मुश्रीफ  | पुढारी

Hasan Mushrif On A. Y. Patil: ए.वाय. पाटील यांनी राजकीय आत्मघात करुन घेतला : हसन मुश्रीफ 

सरवडे: पुढारी वृत्तसेवा : स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी आपल्या कार्यकर्त्यांना विरोधकांच्या दावणीला बांधणाऱ्या आणि वरिष्ठांच्या आदेशाला धुडकवणाऱ्या ए. वाय. पाटील यांना जनतेने ‘ बिद्री ‘ च्या निवडणुकीत जमिनीवर आणले होते. परंतु, स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणाऱ्या ए. वाय. यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. त्यांनी स्वतःच स्वतःचा राजकीय आत्मघात करुन घेतल्याची घणाघाती टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. Hasan Mushrif On A. Y. Patil

राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) पक्षाच्या राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्रीचे चेअरमन व माजी आम. के. पी. पाटील होते. यावेळी ए. वाय. यांच्या प्रमुख नेते व हजारो कार्यकर्त्यांनी यापुढील काळात माजी आम. के. पी. पाटील यांच्याच नेतृत्वाखाली काम करण्याचा आणि त्यांना पुढील काळात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी या कार्यकर्त्यांचा मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. Hasan Mushrif On A. Y. Patil

राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी ना. मुश्रीफ यांच्यावर व्हाया कागलमधून माझे राजकारण संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. याला उत्तर देताना मुश्रीफ पुढे म्हणाले की, मेव्हण्या पाहुण्यांना एकसंध राखण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. वर्षभर आपल्याला टाळण्याचा प्रयत्न त्यांनी करून फारकत घेऊन वेगळा निर्णय घेतला होता. कार्यकर्ते सोडून गेल्याने ते उदिग्न झाले आहेत. त्यांनी स्वतः च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ए. वाय. माझा शब्द मोडणार नाहीत, असा ठाम विश्वास होता. पण त्यांनी विश्वासघात केला, याचे वाईट वाटते. त्यांनी राजकीय आत्मघात करुन घेतला आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले की, आपल्या १९८५ च्या पहिल्या निवडणुकीपासून राधानगरीच्या जनतेने मला पाठबळ दिले. परंतु मध्यंतरी आमदारकीच्या दहा वर्षांच्या काळात सोळांकूरच्या टोलनाक्याने आपल्यात व जनतेत अंतर आणले. हा टोलनाकाच आता कायमचा बंद झाला असून जनतेने आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आता थेट आपल्यापर्यंत यावे. आपल्याला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का म्हणजे के. पीं. च्या हृदयाला धक्का असेल. म्हणून माझ्या कार्यकर्त्यांची यापुढे अडवणूक कराल, तर खबरदार, असा सज्जड इशाराही त्यांनी ए. वाय. पाटील यांना दिला. Hasan Mushrif On A. Y. Patil

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर ), केडीसीसीचे संचालक भैय्या माने, तालुकाध्यक्ष व गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगले, भोगावतीचे संचालक धैर्यशील पाटील, हुतात्मा सुतगिरणीचे चेअरमन उमेश भोईटे, तानाजी ढोकरे, तानाजी खोत, नामदेव पाटील  यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसीचे संचालक रणजितसिंह पाटील, अनिल साळोखे, विनय पाटील, मनोज फराकटे, विकास पाटील, अभिषेक डोंगळे, बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील, राजेंद्र भाटळे, फिरोजखान पाटील, धनाजी देसाई, पंडीत केणे, मधुअप्पा देसाई, दीपक किल्लेदार, के. ना. पाटील, विलास कांबळे, भिकाजी एकल, युवराज वारके, एकनाथ पाटील, विश्वनाथ कुंभार, काकासाहेब देसाई, अशोक चौगले, डी. जी. पाटील यांच्यासह राधानगरी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बिद्रीचे संचालक फत्तेसिंह भोसले-पाटील यांनी स्वागत केले. विवेक गवळी यांनी सुत्रसंचालन केले. भिकाजी एकल यांनी आभार मानले.

Hasan Mushrif On A. Y. Patil मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

आज झालेल्या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच कार्यकर्ते गटागटाने कार्यक्रमस्थळी येत होते. सकाळी अकरा वाजताच मुख्य सभागृह भरल्याने बाहेरील मोकळ्या जागेत स्क्रीन लावून कार्यकर्त्यांसाठी मंडप घालण्यात आला. आजच्या मेळाव्यातून के. पीं. नी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती.

मी नव्हे कार्यकर्त्यांनी मला मोठे केले

बिद्रीच्या निवडणुकीत फसगत झाल्याने आपले मूळ कार्यकर्ते परत आपल्याकडे आले आहेत. अशा कार्यकर्त्यांचा अवमान करत मी मोठे केलेले आपल्याला सोडून जात असल्याचे ते म्हणतात. परंतु, आपण कार्यकर्त्यांना नव्हे, तर कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठे केल्याचे उपकार आपण विसरलात. आपल्यावर नाहक आरोप करुन स्वार्थासाठी बाजूला गेलात. यापुढे पक्षनेतृत्वाच्या आडवे जाणाऱ्यांची गय करणार नाही, असा इशाराही के. पी. पाटील यांनी विरोधकांना दिला.

हेही वाचा 

Back to top button