कोल्हापूर : सादळे-मादळे येथे बिबट्याचे पुन्हा दर्शन; वनविभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

कोल्हापूर : सादळे-मादळे येथे बिबट्याचे पुन्हा दर्शन; वनविभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कासारवाडी; पुढारी वृत्तसेवा : सादळे-मादळे (ता. करवीर) येथे रविवारी पुन्हा एकदा बिबट्याचे शेतकऱ्यांना दर्शन झाले. यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे. स्थानिकांच्यात घबराहट निर्माण झाली आहे वन विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले.

सादळे-मादळे, गिरोली, मनपाडळे, कासारवाडी, या जंगल परिसरात बिबट्याचा वावर असतो. दरवर्षी या जंगल परिसरात बिबट्याचे वास्तव्य निदर्शनास येते. रविवारी सकाळी सातच्या सुमारास सादळे येथील शेतकरी ओमकार पाटील, बाजीराव पाटील, अजित कांबळे, सुंदर कांबळे ज्वारीची मळणी करण्यासाठी सिद्धेश्वर मंदिराच्या दक्षिणेला बाशिंग या ठिकाणी गेले असता शेताततून झुडपात जाताना यांनी पाहिला याबरोबरच आणखी कांही शेतकऱ्यांनी थोड्याच अवधीत बाजूच्या शेतात बिबट्या निदर्शनास आला. यावरून स्थानिक नागरिक दोन बिबट्या असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. शनिवारी रात्री या परिसरात शेतात मेंढरं राखताना बिबट्याची चाहूल लागली असल्याचे मेंढपाळांनी सांगितले.

 वनविभागाची शोध मोहीम

गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याचे दर्शन स्थानिक नागरिकांना झाले होते. यामुळे या परिसरात वन विभागाच्यावतीने प्राणी अभ्यासक देवेंद्र भोसले सहाय्यक विनायक आळवेकर , वनसेवक कृष्णात दळवी यांनी शनिवारी रात्री या भागाची पाहणी करून स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना आपले जनावरे बंदिस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच येथे ड्रोन द्वारे पाहणी केली जाणार असल्याचे सांगितले.

Back to top button