Nashik Crime Update | नाशिकमध्ये एमडी विक्रीचा धंदा सुरुच, दोघे गजाआड

नाशिक : एमडी विक्री करताना पकडलेले दोघे संशयित. समवेत गुन्हे शाखेचे विशेष पथक.
नाशिक : एमडी विक्री करताना पकडलेले दोघे संशयित. समवेत गुन्हे शाखेचे विशेष पथक.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या दाेघांना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पकडले आहे. रविवार कारंजा येथून दोघांना ३२ ग्रॅम एमडीसह पकडले. धीरज धनराज चांदनानी (२४, रा. एम. जी. रोड), रोहित सुनील अहिरराव (२७, रा. शांतीनगर, मखमलाबाद शिवार) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.

विशेष पथकातील पोलिस हवालदार देवकिसन गायकर, अंमलदार चंद्रकांत बागडे यांच्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे बुधवारी (दि.१९) ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे आदींच्या पथकाने सापळा रचून दोघांना रविवार कारंजा येथून पकडले. त्यांच्याकडे १ लाख ६० हजार रुपयांचे ३२ ग्रॅम वजनाचा एमडी साठा आढळून आला. दोघांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news