अरविंद केजरीवाल (संग्रहित छायाचित्र)
अरविंद केजरीवाल (संग्रहित छायाचित्र)

Arvind Kejriwal Bail : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

Published on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Arvind Kejriwal Bail : दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून जामीनाच्या प्रतीक्षेत असलेल्या केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायाधीश निया बिंदू यांनी गुरुवारी (दि.२०) दुपारी निर्णय राखून ठेवला होता. मात्र, संध्याकाळी न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. ईडीने केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ४८ तासांचा वेळ मागितला होता. मात्र, न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळून केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे केजरीवाल उद्या शुक्रवारी तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news