Bidri Sugar Factory : बिद्री साखर कारखान्याची निवडणूक जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान | पुढारी

Bidri Sugar Factory : बिद्री साखर कारखान्याची निवडणूक जाहीर; 'या' तारखेला होणार मतदान

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच रणधुमाळी उडालेल्या बिद्री साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया 26 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाच्या 25 जागांसाठी 3 डिसेंबर रोजी मतदान तर 5 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी आज (दि. १२) भोगावती पाठोपाठ बिद्रीचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 26 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्जांची छाननी दोन नोव्हेंबर रोजी होईल तर वैध नामनिर्देशन पत्राची प्रसिद्धी तीन नोव्हेंबर रोजी होईल.

तीन नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज माघार घेता येतील. 20 नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप होईल. तीन डिसेंबर रोजी मतदान तर पाच डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

राधानगरी, भुदरगड,कागल आणि करवीर तालुक्यातील सात गावे असे एकूण 218 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या बिद्री साखर कारखान्याची निवडणुक हाय व्होल्टेज होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले महायुती मधील पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

हेही वाचा

Back to top button