‘मोदी @9’ जनसंपर्क अभियानाची शिवाजी पेठेतून सुरुवात | पुढारी

‘मोदी @9’ जनसंपर्क अभियानाची शिवाजी पेठेतून सुरुवात

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालाला नऊ वर्षपूर्तीबद्दल भारतीय जनता पार्टीने देशभरात ‘मोदी @9’ महाजनसंपर्क अभियानाचे आयोजन केले आहे. याच धर्तीवर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कोल्हापूर उत्तर विधानसभा क्षेत्रामध्ये जनसंपर्क अभियानाची सुरुवात शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकातून करण्यात आली. प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित कदम यांची उपस्थिती होती.

मंगळवारी शिवाजी पेठेमधील संध्यामठ गल्ली परिसरामध्ये भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात आले. 90 90 90 2024 या फोन क्रमांकावर मिस कॉल देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवण्याचे आवाहन करण्यात आले.

देशभरात 20 ते 30 जून या कालावधीत हे महाजनसंपर्क अभियान सुरू होत असून, पंतप्रधानांच्या यशस्वी नववर्षात झालेल्या विकासाभिमुख कामांचा लेखाजोखा माहितीपत्रकाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केले. देशभरात 400 खासदार निवडून आणण्याचा पंतप्रधान मोदींचा मानस आहे. यावेळी विजय जाधव, चंद्रकांत घाटगे, हेमंत आराध्ये, विजय सूर्यवंशी, विजयसिंह खाडे-पाटील, राजसिंह शेळके, विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.

Back to top button