दहावीचा आज निकाल | पुढारी

दहावीचा आज निकाल

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च – एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी (दि. 2) दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील 355 केंद्रांतून सुमारे एक लाख 30 हजार 767 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात कोल्हापुरातील 53 हजार 676, सांगली 38 हजार 554 व सातार्‍यामधील 38 हजार 537 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती कोल्हापूर बोर्डाचे विभागीय सचिव डी. एस. पोवार यांनी दिली.

येथे निकाल पाहा…

www.mahresult.nic.in
http:/// sscresult.mkcl.org
https:/// ssc.mahresults.org.in

Back to top button