'शिव-शाहू'च्या विद्यार्थ्यांना हिंदुस्तान पेट्रोलियमची १.८४ लाखांची शिष्यवृत्ती | पुढारी

'शिव-शाहू'च्या विद्यार्थ्यांना हिंदुस्तान पेट्रोलियमची १.८४ लाखांची शिष्यवृत्ती

सरूड; पुढारी वृत्तसेवा : सरुड (ता. शाहूवाडी) येथील श्री शिव शाहू महाविद्यालयातील एकूण ३३ विद्यार्थ्यांना हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. कंपनीकडून १ लाख ८४ हजार १०० रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. कंपनीच्या वतीने संस्थेचे संचालक युवराज पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे यांच्या हस्ते विद्यार्थी समूहाकडे शिष्यवृत्तीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

हिंदुस्थान पेट्रोलियमचे मुख्य प्रशासकीय अधिक्षक सिद्धार्थ घोलप म्हणाले, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य केले जाते. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सी. डी. कटारे म्हणाले, या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्ण शिक्षणासह करिअर घडवण्यासाठी अग्रेसर राहावे, असे सांगितले. प्राचार्य डॉ.एच.टी. दिंडे यांनी एचपीसीएलची शिष्यवृत्ती ही ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना वरदानच ठरली असल्याचे सांगितले.

यावेळी ‘एचपीसीएल’चे नितीन जाधव, युवराज सरोदे, प्रा. डॉ. पी. बी. पाटील, प्रा. अशोक पाटील, प्रा. सुनील घोलप, प्रा.डॉ.के.ए.पाटील, प्रा.डी.आर.नांगरे, एस.डी. कांबळे, किशोर काळे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत आणि प्रास्ताविक प्रा. प्रदिपकुमार चरणकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रकाश नाईक यांनी केले तर आभार प्रा.आनंदा पाटील यांनी मानले.

Back to top button