कोल्हापुरात आज पाणीपुरवठा बंद | पुढारी

कोल्हापुरात आज पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : चंबुखडी टाकीवरून येणार्‍या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्हची दुरुस्ती बुधवारी (दि. 10) करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्य जलवाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होणार आहे. बालिंगा जलउपसा केंद्रावर अवलंबून असणार्‍या भागामध्ये बुधवारी (दि. 10) दैनंदिन पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच गुरुवारी (दि. 11) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

शहरातील ए, बी वॉर्ड त्यास संलग्नित उपनगरे व शहरांतर्गत येणार्‍या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, शिवाजी पेठ, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ काही भाग, संपूर्ण सी, डी वॉर्ड दुधाळी, गंगावेस, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, बिंदू चौक, आझाद चौक, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी तसेच ई वॉर्डअंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागांतील नागरिकांना पाणीपुरवठा होणार नाही. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.

Back to top button