कोल्‍हापूर : कृष्‍णा नदीत दूषित पाण्यामुळे लाखो मासे मृत्‍युमुखी | पुढारी

कोल्‍हापूर : कृष्‍णा नदीत दूषित पाण्यामुळे लाखो मासे मृत्‍युमुखी

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा उदगाव तालुका शिरोळ येथील कृष्णा नदी पात्रात रासायनिक मळीचे पाणी सोडल्याने लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. आज (शुक्रवार) दुपारपर्यंत परिसरातील नागरिकांनी मासे गोळा करण्यासाठी नदी पात्रात मोठी गर्दी केली होती.

उदगाव येथे कृष्णा नदीत गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची पातळी घटली आहे. अशातच रासायनमिश्रित मळीचे दूषित पाणी नदीत सोडण्यात आले आहे. त्‍यामुळे कृष्‍णा नदीच्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. परिणामी लाखो मृत माशांचा खच नदीपत्रात पडला आहे.
दरम्यान पाण्यावर तरंगणारे मृत मासे गोळा करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. नदीतील मृत माशांचा पडलेला खच आणि मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्‍याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

हेही वाचा : 

Back to top button