कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांसाठी ‘वेलची हार’ | पुढारी

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांसाठी 'वेलची हार'

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील निस्सीम प्रेमातून कोल्हापूरच्या पट्ट्याने खास ‘वेलची हार’ त्यांच्यासाठी मागविला. हैदराबादहून आणलेला हा वेलची हार मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरला.

कोल्हापूरचे ओमकार चौगुले हे ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेचे’ सर्कीय कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील प्रेमापोटी त्यांचा यंदाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हैदराबादेतून खास ‘वेलचीचा हार’ बनवून घेतला. ९ फेब्रुवारीला रात्री बारा वाजता निवासस्थानी हा मुख्यमंत्र्यांच्या हार त्यांना घालण्यात आला. यावेळी ओमकार चौगुले आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता.

Back to top button