गर्भलिंग निदान प्रकरणातील संशयितांची पोलिसांकडून बडदास्‍त, भुदरगडचे पोलिस निरीक्षक संजय मोरेंची बदली | पुढारी

गर्भलिंग निदान प्रकरणातील संशयितांची पोलिसांकडून बडदास्‍त, भुदरगडचे पोलिस निरीक्षक संजय मोरेंची बदली

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी अटकेत असलेल्या संशयितांची भुदरगड पोलिसांनी बडदास्त राखल्याचे प्रकरण पोलिसांना भोवले असून, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची जिल्हा पोलीस प्रमुखांनी तात्काळ बदली केली आहे. यामध्ये सहभागी असलेल्या अन्य पोलिसांचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी अटकेत असलेल्या बोगस डॉक्टर व मुख्य सूत्रधार विजय कोळस्कर व त्याच्या अन्य साथीदारांना पोलिसांनी कोठडीत जेवण, खाऊ पुरविले तसेच त्यांची चांगलीच बडदास्त राखल्याचे सविस्तर वृत्त दैनिक पुढारीने सोमवारी (दि. 30 जानेवारी) रोजी प्रसिद्ध केले होते. हे प्रकरण पोलिसांना चांगलेच भोवले असून, या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा पोलिस प्रमुखांनी 30 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या बदलीचे आदेश दिले. त्यांची बदली सांगली येथे करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षकांची बदली झाली, मात्र या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य दोघांचे काय? कुरुंदवाड येथे केलेल्या मांडवलीचीही चर्चा सर्वत्र जोरात असून, त्या मांडवलीत सहभागी असणाऱ्यांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button