file photo
Latest
आसारामबापू आणखी एका बलात्कार प्रकरणात दोषी; आज शिक्षा होणार
गांधीनगर : पुढारी वृत्तसेवा : स्वयंघोषित संत आसारामबापू याला आणखी एका बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असून, गांधीनगरचे न्यायालय याप्रकरणी मंगळवारी शिक्षा सुनावणार आहे.
उत्तर प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आसारामबापू सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या तुरुंगात असलेल्या आसारामबापूला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गांधीनगरच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी बलात्कार प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले असून, मंगळवारी न्यायालय शिक्षा ठोठावणार आहे. सुरत येथील एका महिलेवर बलात्कार केल्याचे हे प्रकरण असून, २००१ ते २००६ या काळात ही महिला आसारामच्या अहमदाबादेतील मोटेरा येथील आश्रमात राहत असताना हे दुष्कृत्य करण्यात आले होते.

