कोल्हापूर : सादळे येथे भानामतीच्या प्रकाराने नागरिकांच्या मनात घबराट | पुढारी

कोल्हापूर : सादळे येथे भानामतीच्या प्रकाराने नागरिकांच्या मनात घबराट

कासारवाडी, पुढारी वृत्तसेवा : सादळे (ता. करवीर) येथे एका कुटुंबातील वडील आणि दोन मुलांच्या नावाने काळी जादू केल्याचे निदर्शनास आले आहे. काळ्या बाहुलीवर तिघांची नावे लिहून उतारा रस्त्याच्या बाजूला टाकला आहे. यामुळे गावातील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुख्य रस्त्याला लागून सादळे गावात जाताना पाण्याच्या टाकीजवळ एका कोपऱ्यावर गावातील एकाच कुटुंबातील वडील आणि दोन मुलांचे नावे काळ्या बाहुलीवर लिहून ठेवले.

यानंतर आसपास भीतीदायक साहित्य ठेवून अज्ञात व्यक्तीने भानामतीचे कृत्य केले आहे. उताऱ्यातील बाहुल्यांवर विक्रम पाटील, निलेश पाटील आणि निखिल पाटील अशी नावे आहेत. यामुळे गावातील महिला, नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वैज्ञानिक युगात अशा कृत्यांना कोठेही थारा नाही. अशा कृत्यांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने कायदा केला आहे. अशी कृती करणाऱ्या भोंदू बाबांना शिक्षा होणे गरजेचे आहे.

-गिरीश फोंडे माजी जिल्हा कार्याध्यक्ष, अनिस

अशा कृत्यामुळे आमच्या कुटुंबावर कोणताही परिणाम झालेला नाही. आम्ही सर्व कुटुंब सुशिक्षित असल्यामुळे या गोष्टींना आम्ही घाबरत नाही. हा प्रकार निंदनीय आहे.

-डॉ. निखिल पाटील, सादळे

हेही वाचलंत का?

Back to top button