इंडिगोची कोल्हापूर-बंगळूर-कोईमतूर विमानसेवा शुक्रवारपासून सुरू | पुढारी

इंडिगोची कोल्हापूर-बंगळूर-कोईमतूर विमानसेवा शुक्रवारपासून सुरू

उजळाईवाडी; पुढारी वृत्तसेवा :  इंडिगोची कोल्हापूर-बंगळूर-कोईमतूर विमानसेवा शुक्रवार (दि.13) पासून सुरू होत आहे. त्यामुळे इंडिगोची विमानसेवा कोल्हापूरहून देशातील प्रमुख बत्तीस शहरांशी जोडली जाणार आहे .

सध्या कोल्हापूर विमानतळावरून इंडिगोची हैदराबाद, अहमदाबाद, तिरुपती विमानसेवा सुरू आहे, तर स्टार एअर ची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू आहे. शुक्रवार, दि. 13 जानेवारीपासून इंडिगोची कोल्हापूर -बंगळूर-कोईमतूर नियमित विमान सेवा सुरू होत आहे. आठवड्यातील सातही दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी विमान कोल्हापूर विमानतळावर लँडिंग होईल तर सायंकाळी 5 वा. 5 मिनिटांनी कोल्हापूरहून बंगळूरसाठी विमान टेकऑफ होईल. ना. ज्योतिरादित्य सिंधिया या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सेवेला प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमासाठी शाहू महाराज, खा. धनंजय महाडिक, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. ऋतुराज पाटील यांच्यासह उद्योग, व्यापार व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Back to top button