बचत गटाच्या कर्जासाठी सिबिल रिपोर्टचा खर्च जिल्हा बँक करणार : आ. हसन मुश्रीफ | पुढारी

बचत गटाच्या कर्जासाठी सिबिल रिपोर्टचा खर्च जिल्हा बँक करणार : आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महिला बचत गटांच्या कर्ज प्रकरणात लागणार्‍या सिबिल रिपोर्टचा खर्च बँकेच्या वतीने करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नूतनीकरण केलेल्या अद्ययावत व सुसज्ज महिला विकास कक्षाचे उद्घाटन बँकेच्या ज्येष्ठ संचालिका माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बँकेशी 47 हजार महिला बचत गट सलग्न असून या माध्यमातून दहा लाखांहून अधिक महिला सभासद बँकेशी जोडल्या गेल्या आहेत.

कर्जाची मागणी करणार्‍यांना तसेच अनुदानास व व्याजसवलतीस पात्र बचत गटांना सिबिल रिपोर्ट बंधनकारक असल्याने माहिलांचा वेळ आणि पैसाही खर्च होत असतो. त्यामुळे बँकेने हा निर्णय घेतला असल्याने महिला बचत गटांना दिलासा मिळाला, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष आ. राजूबाबा आवळे, आ. पी. एन. पाटील, खा. संजय मंडलिक, आ. सतेज पाटील, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. राजेश पाटील, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रा. अर्जुन आबिटकर, रणजितसिंह पाटील उपस्थित होते.

Back to top button