कोल्हापूर : पोलिस भरती प्रक्रिया 3 जानेवारीपासून | पुढारी

कोल्हापूर : पोलिस भरती प्रक्रिया 3 जानेवारीपासून

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा पोलिस दलातील रिक्त 24 पोलिस शिपाई पदांसाठी 3 जानेवारीपासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या 24 जागांसाठी 3232 अर्ज दाखल झाले असून, सुरुवातीला 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यानंतर 50 गुणांची शारीरिक चाचणी होईल.

भरतीबाबतची बैठक नुकतीच पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आठवडा ते पंधरा दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार असून, याची अधिकार्‍यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Back to top button