कोल्हापूर : मौजे वडगावच्या सरपंचपदी कस्तुरी पाटील; जय शिवराय ग्रामविकास आघाडीचा विजय | पुढारी

कोल्हापूर : मौजे वडगावच्या सरपंचपदी कस्तुरी पाटील; जय शिवराय ग्रामविकास आघाडीचा विजय

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : मौजे वडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढतीत शिवराय ग्रामविकास आघाडीच्या कस्तुरी अविनाश पाटील लोकनियुक्त सरपंच यांची निवड झाली. त्याच्यासह आठ सदस्य विजयी झाले आहेत. सत्ताधारी संयुक्त ग्रामविकास आघाडी व मौजे वडगाव ग्रामविकास आघाडी यांचा दारूण पराभव करून सत्तांतर घडवले.

हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव हे गाव लोकसंख्येने लहान असुन मतदार संख्या ३००० हजाराच्या आसपास असली तरी यात तिन्ही आघाड्यांमध्ये मताचे विभाजन झाले. मात्र, सत्ताधारी संयुक्त ग्रामविकास आघाडी,वा मौजे वडगांव ग्रामविकास आघाडीचा पराभव करत जय शिवराय ग्रामविकास आघाडीच्या लोकनियुक्त सरपंच पदी सौ. कस्तुरी अविनाश पाटील या ११९ मतांनी विजयी झाल्या. व आठ सदस्य विजयी झाले. तर सत्ताधारी संयुक्त आघाडीचे तीन सदस्य विजयी झाले.

जय शिवराय आघाडीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:-

सुवर्णा श्रीकांत सुतार, स्वप्नील रावसाहेब चौगुले, दिपाली दयानंद तराळ, सविता तानाजी सावंत, सुनिल सर्जेराव खारेपाटणे, सुरेश मनोहर कांबरे, सुनिता दगडू मोरे, रघुनाथ यशवंत गोरड, सत्ताधारी गटाचे नितीन संभाजी घोरपडे, सौ. मधुमती सचिन चौगुले, अश्विनी संतोष आकीवाटे निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

हेही वाचलंत का?

Back to top button