कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या सुभेदारीसाठी शिंदे गट व भाजपाची घौडदौड | पुढारी

कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या सुभेदारीसाठी शिंदे गट व भाजपाची घौडदौड

कल्याण, पुढारी वृत्तसेवा : कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पैकी एका ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक झाली. उर्वरीत आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी कल्याण पंचायत समिती कार्यालयात पार पडली.

कल्याण तालुक्याच्या ग्रामपंचायतीवर शिवसेना भाजप व राष्ट्रवादीचा वर्चस्व होतं. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गटाने या ग्रामपंचयातीच्या निवडणूका प्रतिष्ठेची करीत वचस्व पणाला लावीत शिवसेनेच्या दोन्ही गटाने सर्वात जास्त जागा निवडून आणण्यासाठी आपली शक्ती पणाला लावले.

ठाकरे गटाने व शिंदे गटाने प्रत्येकी तीन जागा भाजपाने दोन जागा तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले .या निवडणुकीत ठाकरे गट व शिंदे गटाच्या संघर्षमय लढाईच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला दारून प्रभावाला सामोरे जाण्याची नामुष्की ओढवल्याचे चित्र दिसून आले.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी फारकत घेत त्याच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलेल्या शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेने कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीवर आपले वचस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपाच्या मदतीने कल्याण तालुक्याच्या ग्रामपंचायतीवर आघाडी घेतली आहे.

कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी व सदस्य पदाच्या निवडणुकीत काकडपाडा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याने तर इतर आठ ग्राग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी २६ तर सदस्य पदासाठी १०९ सदस्य निवडणूक रिगणात उभे होते.

.हेही वाचा  

सांगली : आटपाडीत देशमुख आणि पडळकर बंधूंच्या माध्यमातून भाजपचा धमाका

बीड : गेवराई तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर; राष्ट्रवादी काँग्रसने मिळवले वर्चस्व

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात भाजपची मुसंडी, ठाकरे गटाला धक्का!

Back to top button