कोल्हापूरचा चेहरा-मोहरा 2025 पर्यंत बदलणार : आ. सतेज पाटील | पुढारी

कोल्हापूरचा चेहरा-मोहरा 2025 पर्यंत बदलणार : आ. सतेज पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : रॉयल 09 टुरिस्ट बिझनेस हब सारख्या आधुनिक प्रकल्पांमुळे कोल्हापूरचा चेहरामोहरा 2025 पर्यंत बदलणार, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. स्टेशनरोड वरील जुन्या व सुप्रसिद्ध हॉटेल टुरिस्टच्या जागेत सूरज इस्टेट डेव्हलपर्सतर्फे रॉयल 09 टुरिस्ट बिझनेस हब प्रकल्प उभारणीचा प्रारंभ सोमवारी झाला. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व उद्योज संजय घोडावत, डॉ. संजय डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.

गेली 65 वर्षे आदरातिथ्य, पर्यटन, व्यापार, उद्योग या क्षेत्रात ठसा उमटविणार्‍या हॉटेल टुरिस्टच्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील भव्य व्यावसायिक प्रकल्प उभा रहात आहे. आकर्षक वास्तुरचना, प्रशस्त लॉबी व अँट्रीयम, दुमजली पार्किंग व्यवसायासाठी उत्तम सुविधा व कार्पोरेट क्षेत्रासाठीचे प्रभावशाली वातावरण असलेने ही बहुमजली वास्तू कोल्हापूरच्या उद्योग व्यवसायाला नवीन संधी देणारी ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, चेअरमन आर. ए. ऊर्फ बाळ पाटणकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, राम पुरोहित, उद्योजक सचिन मेनन, हर्षद दलाल, सचिन शिरगावकर, कांतीलाल चोरडिया, सचिन झंवर, शंकर दुल्हानी, बांधकाम व्यावसायिक प्रवीणसिंह घाटगे, अर्जुन माने आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूरज इस्टेट डेव्हलपर्सचे भागीदार आनंद माने यांनी स्वागत तर राजीव परीख यांनी प्रकल्पाची माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली. चेतन वसा यांनी आभार मानले.

Back to top button