कोल्हापूर : अर्धा तोळे सोन्याचे घोटणे, पत्की भाग्यवान विजेते | पुढारी

कोल्हापूर : अर्धा तोळे सोन्याचे घोटणे, पत्की भाग्यवान विजेते

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या दै.‘पुढारी’ टोमॅटो एफएम आयोजित शॉपिंग उत्सव 2022 योजनेचा ग्रामीण लकी ड्रॉ मार्केट यार्डातील वारणा बँकेच्या शाखेत काढण्यात आला. यामध्ये पहिल्या क्रमांकाचे अर्धा ताळे सोने बक्षिसाचे सरिता घोटणे (कुपन क्र. 3239) व सिद्धी पत्की (कुपन क्र.15040) हे भाग्यवान विजेते ठरले.

दै. ‘पुढारी’ने आयोजित केलेल्या शॉपिंग उत्सवाला भरघोस प्रतिसाद मिळतो. या शॉपिंग उत्सवात सहभागी दुकानांमधून वस्तू खरेदीचा आनंद लुटत ग्राहक नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात. यंदाच्या शॉपिंग उत्सवाचा लॅकी ड्रॉ उत्साहात झाला. दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे, व्हा. चेअरमन उत्तम पाटील, सरव्यवस्थापक प्रकाश डोईजड, सहायक व्यवस्थापक बाळासाहेब नायकवडे यांच्या हस्ते काढण्यात आला.

द्वितीय क्रमांकाचे बक्षीस वॉशिंग मशिन आहे. यातील भाग्यवान विजेते आहेत राजश्री नाईक (कुपन क्र. 3288), बसवंत फडके (कुपन क्र. 0232 ), तृतीय क्रमांकाच्या स्मार्ट फोनचे पाच विजेते असे ः संदीप पाटील (कुपन क्र. 856), सर्जेराव सावंत (कुपन क्र. 433), तृप्ती रंगरेज (कुपन क्र. 15816), रेखा कारंडे (कुपन क्र. 15205), अश्विनी पाटील (कुपन क्र. 30472 ).

ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या शॉपिंग उत्सव 2022 साठी एस. एस. मोबाईल मुख्य प्रायोजक आहेत. तनिष्क सहयोगी प्रायोजक आहेत.
गिरीश सेल्स, वारणा बँक, महेंद्र ज्वेलर्स, स्फूर्ती, चिपडे सराफ व राजाकाका ई मॉल हे सहप्रायोजक आहेत. स्वागत व प्रास्ताविक जावेद शेख यांनी केले.

दै. ‘पुढारी’ने सोनेरी भेट दिली

पहिल्या क्रमांकाची अर्धा तोळे सोन्याची विजेती ठरलेल्या सिद्धी पत्की यांनी दै. ‘पुढारी’ ने मार्गशीर्ष महिन्यात सोन्याची भेट दिली. त्यामुळे आनंद द्विगुणीत झाला आहे. पैठणी इचलकरंजी कपड्याच्या दुकानात खरेदी केली होती. तिथे खरेदी केल्यावर हमखास बक्षीस मिळणार असल्याचा विश्वास होता, असे त्यांनी सांगितले.

Back to top button