दैनिक पुढारी-टोमॅटो एफएमच्या ‘शॉपिंग उत्सव २०२२’चा आज दुसरा लकी ड्रॉ | पुढारी

दैनिक पुढारी-टोमॅटो एफएमच्या ‘शॉपिंग उत्सव २०२२'चा आज दुसरा लकी ड्रॉ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : लाखो रुपयांची बक्षिसे जिंकून देण्याची संधी असणाऱ्या दैनिक ‘पुढारी टोमॅटो एफएम’ने आयोजित केलेल्या शॉपिंग उत्सव २०२२ या योजनेचा दुसरा लकी ड्रॉ आज गुरुवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स येथे होणार आहे. सायंकाळी चार वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

घटस्थापनेपासून म्हणजेच २६ सप्टेंबरपासून सुरू झालेली ही योजना आहेत. १० नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. या योजनेत सहभागी झालेल्या दुकानातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कुपन दिले होते. हे कुपन भरल्यानंतर ग्राहकांचाही या योजनेत समावेश झाला होता. या योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांना

लकी ड्रॉ काढून लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये सोने, वॉशिंग मशिन, स्मार्ट फोन, ब्लेंडर, हेडफोन व सरप्राईज गिफ्ट दिली जाणार

या योजनेसाठी एसएस मोबाईल हे मुख्य प्रायोजक तर तनिष्क हे सहयोगी प्रायोजक आहेत. गिरीष सेल्स, महेंद्र ज्वेलर्स, स्फूर्ती, चिपडे सराफ, वारणा बँक व राजाकाका ई-मॉल हे सहप्रायोजक आहेत.

 

Back to top button