कोल्हापूर: दत्तवाड येथे शॉर्ट सर्किटने चार एकरातील ऊस जळून खाक | पुढारी

कोल्हापूर: दत्तवाड येथे शॉर्ट सर्किटने चार एकरातील ऊस जळून खाक

दत्तवाड: पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील बिरनाळ रोडवरील सुमारे चार एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील बिरनाळ रोडवरील गट नंबर २६० गुंडा व्हसकल्ले, गट नंबर २६४ बाबासो कमते, व गट नंबर २७४ आप्पासो हेब्बाळे या शेतकऱ्यांच्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आग इतकी भयानक होती की, बघता बघता त्यांनी रौद्ररूप धारण केले. फडाला आग लागल्याचे लक्षात येताच या भागातील प्रदीप हेब्बाळे, बाहुबली हेब्बाळे, भैय्या व्हसकल्ले, पवन धोत्रे, सुरेश हेबाळे, सचिन संकपाळ, राकेश हेब्बाळे, संतोष सवळे, सुरज पाटील, पवन हेबाळे, या तरुणासह शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

त्यामुळे मोठे नुकसान टाळता आले. मात्र तोपर्यंत अंदाजे चार एकरमधील ऊस जळून खाक झाला. हाता तोंडाला आलेले ऊस पीक जळाल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येऊन या भागाची पाहणी केली. सदर घटनेचा त्वरित पंचनामा होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button