कोल्हापूर : ‘गोकुळ’कडून विक्रमी 102 कोटींचा दूध उत्पादकांना फरक | पुढारी

कोल्हापूर : ‘गोकुळ’कडून विक्रमी 102 कोटींचा दूध उत्पादकांना फरक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) दूध उत्पादकांना 102 कोटी 83 लाख रुपयांचा फरक देणार आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम दूध उत्पादकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत फरकाची रक्कम 19 कोटी रुपये जादा आहे. या निर्णयाने दूध उत्पादकांची यंदाची दिवाळी दणक्यात साजरी होणार असल्याचे आ. हसन मुश्रीफ व आ. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दि. 1 ऑक्टोबरपासून आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे गायींमध्ये गर्भ प्रत्यारोपण करण्याचा प्रयोग ‘गोकुळ’ करणार असल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.

‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतरचा हा पहिला फरक आहे. सत्तांतरानंतर राबविलेले बचत व काटकसरीच्या धोरणाने टँकर वाहतूक, रोजंदारी कर्मचारी कपात, महानंदा पॅकिंग खर्च बचत, दूध वाहतूक टेम्पो भाडे कपात, दूध पावडर विक्री नफा या सर्व बचतीतून 17 लाख,
तर दर फरकातील 6 टक्के, महिन्याचे व्याज 62 लाख रुपये, डीबेचर्स व्याज 6 टक्क्यांप्रमाणे 15 लाख, संस्था डिव्हिडंड 11 टक्क्यांप्रमाणे 65 लाख असे एकूण 19 कोटी 4 लाख रुपये जादाची रक्कम प्राथमिक दूध संघांना व दूध उत्पादकांना मिळणार आहे. म्हैस व गाय दूध उत्पादकांना 20 पैसे प्रतिलिटर दर जादा मिळणार आहे.

यावेळी ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे, शशिकांत चुयेकर, बाळासाहेब खाडे, नविद मुश्रीफ, सुजित मिणचेकर, अजित नरके, अभिजित तायशेटे, करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, रणजित पाटील, एस. आर. पाटील, प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगुले, प्रा. किसन चौगुले, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, नंदकुमार ढेंगे, युवराज पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग विभागाचे हनुमंत पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button