नृसिंहवाडीत कडकाेट पोलिस बंदोबस्त | पुढारी

 नृसिंहवाडीत कडकाेट पोलिस बंदोबस्त

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी हातात स्वाभिमानी झेंडे घेवून हजारो पुरग्रस्त शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली पदयात्रा आज दुपारी दीड वाजता हेरवाड येथे दाखल झाली. हेरवाड ग्रामस्थांनी पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. दरम्‍यान, नृसिंहवाडीत कडकाेट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

दरम्यान गावातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा शिवशैल हॉल येथे पोहोचली. 3 वाजता पदयात्रा कुरुंदवाडच्या दिशेने प्रयाण होणार आहे. पदयात्रेच्या पार्श्वभूमिवर शहरात प्रमुख रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली आहे. येथील पालिका चौकात सभा होणार आहे.

कुरुंदवाड येथील कृष्णा घाट, दिनकराव यादव पूल व नदी परिसरात पोलिस आणि रेस्क्यू फोर्सच्या जवानांचे पथक 10 यांत्रिक बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांचे नदी परिसरात यांत्रिक बोटीद्वारे गस्त घालत आहेत.

राजू शेट्टी यांनी नृसिंहवाडीत जलसमाधी घेणार, अशी घोषणा केल्याने पोलिस प्रशासनाने कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. राजू शेट्टींना जलसमाधी घेण्यापासून अटकाव करण्यासाठी पोलिसांनी नृसिंहवाडीत येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. तर दिनकरराव यादव पुलाजवळ रेस्क्यू फोर्सची 5 पथके पोलिसांनी तैनात केली आहेत.

पंचगंगा नदीत पुराचे पाणी कमी झाले आहे. नदीत प्रचंड गाळ आहे. त्यामुळे नदीत कुणी उड्या घेतल्या तर गाळातून वर निघणे कठीण होऊ शकते. त्यामुळे पोलिस गस्त घालत आहेत. दिनकरराव यादव पूल परिसरात मोठा पोलिस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचलत का?

#26/11 : फ्रंटलाईन वर्करच्या भूमिकेत असणाऱ्या डॉ. सुजाता म्हणजेच मृण्मयी देशपांडेचा अनुभव

Back to top button